प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सध्या तीन देशांच्या दौऱ्यावर असून आज सकाळी या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात ते ब्राझिलला पोहोचले आहेत. तिथं मोदी यांचं भारतीय जनसमुदायानं उत्साहाने जोरदार स्वागत केलं. ब्राझिलमधल्या रिओ डी जानिरो शहरात आयोजित जी-२० शिखर परिषदेला आज उपस्थित राहणार आहेत. शिखर परिषदेच्या निमित्ताने तिथे आलेल्या जागतिक नेत्यांबरोबर ते द्विपक्षीय चर्चा करतील. शिखर परिषदेमध्ये सहभागी होणाऱ्या नेत्यांमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचा समावेश आहे. गेल्या वर्षी नवी दिल्ली इथं झालेल्या जी-२० शिखर परिषदेच्या जाहीरनाम्यातल्या मुद्द्यांच्या अनुषंगाने मोदी परिषदेत मांडणी करतील. ‘न्यायसुसंगत आणि शाश्वत ग्रहाची आणि पर्यायांनं जगाची निर्मिती’ असं यंदाच्या जी-२० शिखर परिषदेचं सूत्र आहे.
Site Admin | November 18, 2024 1:01 PM | G20 Summit | PM Narendra Modi
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ब्राझीलमध्ये जी-२० शिखर परिषदेमध्ये सहभागी होणार
