प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत नाताळ उत्सवात सहभागी होणार आहेत. भारतीय कॅथोलिक बिशप्स परिषदेतर्फे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी ख्रिस्ती समाजाचे प्रमुख नेते, चर्चचे कार्डिनल्स आणि बिशप्स यांच्याशी चर्चा करतील. कॅथोलिक चर्चच्या मुख्यालयातील प्रधानमंत्र्यांचा हा पहिलाच कार्यक्रम आहे.