भगवान गौतम बुद्धांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार देशाच्या विकासाचा मार्ग अभूतपूर्व आणि सकारात्मक बदल घडवणारा असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. विकासाच्या मार्गावर पुढे चालत असताना आत्मविश्वास आणि आत्मसन्मान आवश्यक आहे.आंतरराष्ट्रीय अभिधम्म दिवसानिमित्त नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
भाषा,साहित्य,कला आणि आध्यात्मिकता हे सांस्कृतिक आधारस्तंभ देशाला वेगळी ओळख देतात,असंही ते म्हणाले.जगात विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात पुढे जाताना, देशाची संस्कृती आणि मूल्यांचा अभिमान बाळगण्याचं आवाहन त्यांनी युवकांना केलं.पाली भाषेला अभिजात दर्जा दिल्यामुळं भगवान बुद्धांच्या वारशा प्रती आदर व्यक्त केल्याचं त्यांनी सांगितलं. मूळ भारतीय असणाऱ्या ६०० पुरातन कलाकृती आणि अवशेष भारतात परत आणल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.