प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आपला ५ दिवसांचा नायजेरिया, ब्राझील आणि गयाना या देशांचा दौरा आटोपून मायदेशी परतले. प्रधानमंत्र्यांनी या दौऱ्यात विविध नेत्यांबरोबर ३१ द्विपक्षीय बैठका घेतल्या आणि अनौपचारिक चर्चाही केल्या. प्रधानमंत्री ब्राझीलमध्ये १०, गयानामध्ये ९ तर नायजेरियात एका द्वीपक्षीय बैठकीत सहभागी झाले. या दौऱ्यात प्रधानमंत्र्यांनी इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्राबोवो सुबियांतो, पोर्तुगालचे प्रधानमंत्री लुईस मोंटेनेग्रो, ब्रिटनचे प्रधानमंत्री कीर स्टारमर, चिलीचे राष्ट्रपती गॅब्रियल बोरिच आणि अर्जंटीनाचे राष्ट्रपती झेवियर माइली यांच्याबरोबर बैठका घेतल्या. याशिवाय प्रधानमंत्र्यांनी सिंगापूर, दक्षिण कोरिया, इजिप्त, अमेरिका आणि स्पेन या देशांच्या नेत्यांबरोबर आणि आंतरराष्ट्रीय संघटनांच्या प्रमुखांबरोबर अनौपचारिक चर्चा केली. या दौऱ्यावर जाताना प्रधानमंत्र्यांनी त्या देशांसाठी भारताच्या विविध भागातून भेटवस्तू नेल्या होत्या, यात महाराष्ट्रातल्या वस्तूंचाही समावेश होता.
Site Admin | November 22, 2024 8:00 PM | PM Narendra Modi