सिकलसेल आजाराशी संबंधित आव्हानांना तोंड देण्यासाठी केंद्र सरकार तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करत असल्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. आजच्या जागतिक सिकल सेल दिवसाच्या निमित्तानं समाजमाध्यमावरून दिलेल्या संदेशात या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकार वचनबद्द असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला आहे. या आजाराचं निदान आणि त्यावरील उपचार अशा विविध पैलूंवर सरकार काम करत असल्याचंही त्यांनी संदेशात म्हटलं आहे.
दरम्यान, या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी त्याचं लवकर निदान करणं, उपचार करणं आणि रुग्णाची योग्य ती काळजी घेण्यासाठी आवश्यक ते उपाय करण्यावर भर दिला जात असल्याचं केंद्रीय आरोग्यमंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी सांगितलं.