महाकुंभ 2025 हा एकता-समतेचा महायज्ञ ठरेल, देशाला मार्गदर्शन करेल आणि त्याची सर्वत्र चर्चा होईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. 13 जानेवारी 2025 पासून अधिकृतपणे सुरू होणाऱ्या महाकुंभ-2025 चं औपचारिक उद्घाटन केल्यानंतर ते प्रयागराज संगम परिसरात एका मेळाव्यात बोलत होते. या प्रसंगी, त्यांनी सुमारे 6 हजार 670 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचा शुभारंभ केला, यात प्रयागराजमधल्या पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी आणि अखंड संपर्क प्रस्थापित करण्यासाठी अनेक रेल्वे आणि रस्ते प्रकल्पांचा समावेश आहे. आपलं सरकार संस्कृती आणि वारसा समृद्ध करण्यासाठी काम करत असल्याचं ते म्हणाले. यावेळी पंतप्रधानांनी काही प्रमुख मंदिर परिसरांचं उद्घाटनही केलं.
Site Admin | December 14, 2024 9:22 AM | PM Narendra Modi | Prayagraj