डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

आरोग्याशी संबंधित विविध विकास कामांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन आणि भूमिपूजन

देशातले नागरिक निरोगी असतील तर देशाच्या प्रगतीला गती मिळते, त्यामुळेच देशात आरोग्य विषयक पायाभूत सुविधांचा विस्तार करण्याला आपल्याला सरकारनं प्राधान्य दिलं आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.  धन्वंतरी जयंती आणि नवव्या आयुर्वेद दिनानिमित्त प्रधानमंत्र्यांच्या हस्ते नवी दिल्ली इथं झालेल्या कार्यक्रमात आरोग्य क्षेत्राशी संबंधित सुमारे १२ हजार ८५० कोटी रुपयांच्या अनेक प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी झाली, त्यावेळी ते बोलत होते. प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा, निदान सुविधा, परवडणारी औषधं आणि उपचार, छोटी शहरं आणि खेड्यांमधे पुरेशा आणि योग्य आरोग्यविषयक सेवा तसंच आरोग्य क्षेत्रात तंत्रज्ञानाचा विस्तार असे पाच प्रमुख स्तंभ आखून आपलं सरकार काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं. 

 

विज्ञाननिष्ठ सर्वंकष संशोधनाच्या माध्यमातून पारंपारिक औषधी वनस्पतींची उपयोगिता प्रमाणित करता येईल असं ते म्हणाले. आयुषच्या यशामुळे आरोग्य क्षेत्रासोबत अर्थव्यवस्थेतही बदल होत आहेत, गेल्या दहा वर्षांत आयुष उत्पादन क्षेत्र तीन अब्ज डॉलरवरून २४ अब्ज डॉलरपर्यंत वाढलं आहे असं त्यांनी सांगितलं. सध्या देशात ९०० आयुष स्टार्ट अप कार्यरत असून, त्यामुळे तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण झाल्या असल्याचं ते म्हणाले.

 

या कार्यक्रमात प्रधानमंत्र्यांनी आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत ७० आणि त्यापेक्षा जास्त वर्ष वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या आरोग्य विम्याच्या विस्ताराचा प्रारंभ केला. देशातलं पहिल्या अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेच्या दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन त्यांनी केलं. मध्य प्रदेशातली तीन वैद्यकीय महाविद्यालयांचं उद्घाटन आणि पाच परिचारिका महाविद्यालयांची पायाभरणी,  तसंच हिमाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, आसाम आणि नवी दिल्ली इथल्या एम्स रुग्णालयांतल्या सुविधा आणि सेवांच्या विस्ताराचं उद्घाटनही त्यांच्या हस्ते झालं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा