२०४७ पर्यंत देशाला विकसित करण्यात ज्ञान महत्त्वाची भूमिका बजावेल, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. बिहारमधल्या राजगीर इथं नालंदा विद्यापीठाच्या नव्या कॅम्पसच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. भारतीय शिक्षण आणि ज्ञान पद्धती मजबूत करुन भारत सुपर पावर बनू शकतो. जगाला भारताची ओळख आणि परंपरेचं दर्शन घडवण्यासाठी नालंदा विद्यापीठ हे उत्तम उदाहरण असल्याचं ते म्हणाले.
शिक्षणाच्या क्षेत्रात जागतिक भागिदारी यामुळं तयार होत असल्याचं परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर म्हणाले. जागतिक सामंजस्यासाठी शिक्षण, प्रशिक्षण आणि क्षमता विकास हे परिणामकारक मार्ग असल्याचं त्यांनी सांगितलं.