ईशान्य भारतातल्या आठ राज्यांचं प्रतिनिधित्व करणारा अष्टलक्ष्मी महोत्सव हा ईशान्य भारतातील उत्पादन आणि सेवा देश आणि जगासमोर प्रदर्शित करण्याचा पहिला मोठा प्रयत्न आहे. जगभरातल्या गुंतवणूकदारांसाठी इथे मोठ्या संधी उपलब्ध होतील असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथं आयोजित अष्टलक्ष्मी महोत्सवाचं उदघाटन केल्यानंतर ते बोलत होते. सरकारच्या अथक प्रयत्नांमुळे ईशान्य भारतातल्या राज्यांमधला हिंसाचार कमी होत असून पायाभूत सुविधांचा मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे. भावी काळातल्या भारताच्या प्रगतीमध्ये ईशान्य भारताचा मोठा वाटा असेल, असं ते म्हणाले.
तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात ईशान्य भारताच्या सांस्कृतिक विविधतेच दर्शन घडवणाऱ्या पारंपरिक नृत्यकला, हस्तकला, वस्त्रं, खाद्यसंस्कृती, पर्यटनस्थळं इत्यादींचा मिलाफ दिसून येईल.