गुजरातमधे वडोदरा इथं C-295 लष्करी विमानांच्या निर्मितीसाठी तयार करण्यात आलेल्या टाटा एअरक्राफ्ट संकुलाचं उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि स्पेनचे प्रधानमंत्री पेड्रो सांचेझ यांच्या हस्ते आज झालं. टाटा एअरबस प्रकल्प हा मेक इन इंडिया उपक्रमांतर्गत लष्करी विमानांसाठीचा भारतातला खाजगी क्षेत्रातला पहिला एरोस्पेस प्रकल्प आहे. भारत आणि स्पेनदरम्यान संरक्षणक्षेत्रातले संबंध या प्रकल्पामुळे अधिक दृढ होतील, त्याचप्रमाणे मेक इन इंडियालाही बळ मिळेल, असं प्रधानमंत्री मोदी यावेळी म्हणाले. भारत साऱ्या जगासाठी विमानं तयार करील तो दिवस फार दूर नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं दोन्ही नेत्यांनी विमानतळापासून टाटा एअरक्राफ्ट संकुलापर्यंत रोड शो केला. भारताच्या विमान उद्योग क्षेत्राची दारं या प्रकल्पामुळे युरोपातल्या कंपन्यांसाठी खुली झाली असल्याची प्रतिक्रीया स्पेनचे प्रधानमंत्री पेद्रो सांचेझ यांनी नोंदवली.