देशभरात विविध सरकारी मंत्रालये आणि विभागांमध्ये नोकरीसाठी निवड झालेल्या ७१ हजारांहून अधिक उमेदवारांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे नियुक्तीपत्र प्रदान केलं. यावेळी त्यांनी उमेदवारांना संबोधित केलं. हा रोजगार मेळावा देशभरात ४५ ठिकाणी आयोजित करण्यात आला.
केंद्र सरकारच्या विविध मंत्रालये आणि विभागांसाठी भर्ती केली जात आहे. देशभरातून निवडलेले नवे उमेदवार गृह मंत्रालय, टपाल कार्यालय, उच्च शिक्षण विभाग, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, वित्तीय सेवा विभाग यांसारखी विविध मंत्रालये/विभागांमध्ये नियुक्त होतील.