डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

पॅरालिंपिक स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंशी प्रधानमंत्र्यांनी साधला संवाद

पॅरिस इथं नुकत्याच झालेल्या पॅरालिंपिक स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला. या स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या पदकविजेत्या आणि इतर स्पर्धकांचं त्यांनी अभिनंदन केलं. या दिव्यांग खेळाडूंचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सर्वांसाठीच एक मोठी शक्ती असल्याचं ते म्हणाले. 

या स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवणाऱ्या सुमित अंतिल यानं आपलं एक सुवर्ण पदक प्रधानमंत्र्यांना समर्पित केलं. तर प्रधानमंत्र्यांनी या स्पर्धेपूर्वी दिलेलं प्रोत्साहन आपण कधीच विसरू शकणार नाही, अशा शब्दात    रौप्य पदक विजेत्या शरद कुमारनं आपल्या भावना व्यक्त केल्या. प्रधानमंत्र्यांप्रमाणे यापूर्वी कोणीच पॅरालिंपिक स्पर्धांकडे इतक्या सकारात्मकतेनं पाहिलं नव्हतं असं त्यानं सांगितलं. प्रधानमंत्र्यांच्या शब्दांमुळे आपण कोणतंही दडपण येऊ न देता खेळू शकलो आणि त्यांच्या पाठिंब्यामुळे यश प्राप्त करू शकलो, असं मत इतर खेळाडूंनी व्यक्त केलं. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा