जम्मू- काश्मिर आणि लडाखमधल्या लोकांसाठी सरकार काम करत असून आगामी काळात या राज्यातल्या जनतेच्या आकांक्षा पूर्ण होतील असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. पाच वर्षांपूर्वी ५ ऑगस्ट रोजी संसदेनं कलम ३७० आणि ३५ अ रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये प्रगती आणि समृद्धीच्या नव्या पर्वाची सुरुवात होती असं प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावर केलेल्या एका पोस्टमध्ये म्हटलं आहे. कलम ३७० आणि ३५ अ रद्द केल्यामुळे महिला, तरुण, मागासवर्गीय, आदिवासी आणि विकासापासून वंचित असलेल्या उपेक्षित समुदायांना सुरक्षा, सन्मान आणि विविध संधी उपलब्ध झाल्या असल्याचं त्यांनी नमूद केलं.
३७० आणि ३५ अ कलम रद्द झाल्यापासून जम्मू-कश्मीर आणि लडाखमधे मोठी वाढ आणि प्रगती दिसून येत असल्याचं भाजपा अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी म्हटलं आहे.