जी-सेवन परिषदेत जागतिक समुदायाला लाभदायक ठरतील अशा प्रभावी उपाययोजना आखण्यासह भावी पिढीसाठी एका उत्तम जगाची निर्मिती करण्यासाठी सर्वांनी वचनबद्धता दर्शवली, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. इटलीचा दौरा आटोपून नवी दिल्लीला परतल्यानंतर हा दौरा अतिशय फलदायी झाल्याचं त्यांनी समाज माध्यमवरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. या दौऱ्यात जागतिक नेत्यांशी विविध विषयांवर चर्चा झाली, असं त्यांनी सांगितलं.
या परिषदेनिमित्त जमलेल्या इतर राष्ट्रप्रमुखांशी प्रधानमंत्र्यांनी या दौऱ्यात चर्चा केली. इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी, जपानचे प्रधानमंत्री फुमिओ किशिदा यांच्याबरोबरच संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँतोनिओ गुटेरस यांचीही मोदी यांनी भेट घेतली.