डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

युनेस्कोच्या जागतिक वारसा केंद्रासाठी भारताकडून १ दशलक्ष डॉलर्सचं योगदान

 

जागतिक वारसा जतन करणं ही भारत आपली जबाबदारी मानत असून, युनेस्कोच्या जागतिक वारसा केंद्रासाठी एक दशलक्ष डॉलर्सचं योगदान देण्याची घोषणा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. जागतिक वारसा समितीच्या ४६ व्या बैठकीचं काल नवी दिल्लीत पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते. भारताचा वारसा केवळ इतिहास नाही, तर विज्ञानही आहे, भारताच्या हजारो वर्षांच्या परंपरांचा लाभ जगाला झाला पाहिजे, असं त्यांनी नमूद केलं. या उद्घाटन सोहळ्यात युनेस्कोच्या महासंचालक ऑड्रे अझोले आणि युनेस्को जागतिक वारसा सचिवालयातले वरिष्ठ अधिकारी तसंच विविध देशातले सांस्कृतिक मंत्री, राजदूत आणि तज्ञ उपस्थित होते. भारत पहिल्यांदाच जागतिक वारसा समितीच्या अधिवेशनाचं यजमानपद भूषवत आहे.

 

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा