भारत आणि चीनमधले मतभेद आणि विवाद योग्यरित्या हाताळून शांतता बिघडू न देणं अत्यावश्यक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज अधोरेखित केलं. कझान इथं सोळाव्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री मोदी यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेतली. या बैठकीत भारत-चीन सीमाप्रश्नावर तोडगा काढून शांतता प्रस्थापित करण्यासाठी दोन्ही देशांचे विशेष प्रतिनिधी लवकरच भेटतील, असं निश्चित करण्यात आलं. भारत आणि चीन यांच्यातल्या स्थिर आणि सौहार्दपूर्ण द्विपक्षीय संबंधांचा प्रादेशिक आणि जागतिक शांतता तसंच समृद्धीवर सकारात्मक परिणाम होईल, असं प्रतिपादन प्रधानमंत्र्यांनी यावेळी केलं.
Site Admin | October 23, 2024 8:51 PM | China President Xi Jinping | PM Narendra Modi