विविध पिकांचे दीड हजार पर्यावरण स्नेही वाण येत्या ५ वर्षात उपलब्ध करुन देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून अशा १०९ वाणांचं लोकार्पण लौकरच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असल्याचं केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज राज्यसभेत सांगितलं. फलोत्पादन निर्यातीचं उद्दिष्ट ठेवून पुढच्या ५ वर्षात देशभरात शंभर फलोद्यानं विकसित केली जाणार असून त्याकरता १८ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे असं ते म्हणाले. शेती फायद्याची करण्यासाठी वेगळा दृष्टिकोन अंगीकारण्याची गरज आहे असं सांगून, खतांच्या वाढत्या वापराबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. सरकार सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देत आहे, असं ते म्हणाले. शेतकऱ्यांना आधारच्या धर्तीवर ओळखपत्र जारी करण्याचा विचार त्यांनी बोलून दाखवला. सरकार शेतकरीविरोधी असल्याच्या विरोधकांच्या टीकेवर त्यांनी ताशेरे ओढले. शेतकऱ्यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधीतून दिल्या जाणाऱ्या ६ हजार रुपये अर्थसहाय्याचं मोल विरोधकांना कळणार नाही, असं ते म्हणाले.
Site Admin | August 5, 2024 8:05 PM | Modi | narendra modi | PM Modi