डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

आदिवासी समाजाची वेगानं प्रगती झाली तरच देशाचा विकास होईल या वचनानुसार केंद्र सरकार कार्यरत – प्रधानमंत्री

आदिवासी समाजाची वेगानं प्रगती झाली तरच देशाची प्रगती होईल या महात्मा गांधींच्या वचनानुसार केंद्र सरकार कार्य करत आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आज झारखंडमध्ये हजारीबाग इथं सुमारे ८३ हजार ३०० कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी, लोकार्पण आणि उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते.  झारखंडच्या सर्वांगीण विकासाकरता केंद्रसरकार वचनबद्ध आहे, भाजपाची परिवर्तन यात्रा म्हणजे झारखंडच्या विकासाची संकल्प यात्रा आहे, असं त्यांनी सांगितलं.  

 

आपलं सरकार, आदिवासींचा सन्मान करणारं सरकार आहे, राज्यात पायाभूत सेवा सुविधा अधिक बळकट करायला सरकारचं प्राधान्य आहे, असं प्रधानमंत्री म्हणाले. यावेळी प्रधानमंत्र्याच्या हस्ते ७९ हजार १५० कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या  ‘धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियानाचा’ देखील प्रारंभ झाला. देशभरातल्या आदिवासी समुदायांचा सर्वसमावेशक आणि सर्वांगीण विकास हा या अभियानाचा उद्देश आहे. याशिवाय प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आदिवासी समुदायांसाठी शैक्षणिक पायाभूत सुविधांना चालना देणाऱ्या  40 एकलव्य आदर्श निवासी शाळांचं उदघाटन झालं आणि 2 हजार 800 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या 25 एकलव्य आदर्श निवासी शाळांची पायाभरणी झाली. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा