डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

August 28, 2024 3:34 PM | PM Jan Dhan Yojna

printer

प्रधानमंत्री जनधन योजनेला आज एक दशक पूर्ण

प्रधानमंत्री जनधन योजनेला आज ‘एक दशक’ पूर्ण झालं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २८ ऑगस्ट २०१४ रोजी, ही योजना सुरु केली होती. या योजनेअंतर्गत आतापर्यंत ५३ कोटी जनधन खाती उघडण्यात आली आहेत.  या योजनेच्या दशकपूर्ती निमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी लाभार्थ्याचं अभिनंदन केलं असून ही योजना  यशस्वी केल्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत. आर्थिक समावेशन आणि महिला – युवकांचं,   सक्षमीकरणाच्या प्रयत्नांमधे जनधन योजनेचा महत्त्वाचा वाटा असल्याचं, मोदी यांनी समाजमाध्यमावर म्हटलं आहे.

 

हा जगातला सर्वात मोठा ‘वित्तीय समावेशन उपक्रम’ असून, अर्थ मंत्रालय, यामाध्यमातून उपेक्षित आणि आर्थिकदृष्ट्या मागास घटकांना आधार देण्याचा प्रयत्न सातत्यानं करत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी म्हटलं आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा