दादरा आणि नगर हवेली, दीव आणि दमण हे केंद्रशासित प्रदेश देशाचा वारसा असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सांगितलं. गुजरातच्या सिल्व्हासा इथं आयोजित सभेत ते बोलेत होते. गुजरातमधील या केंद्रशासित प्रदेशांचा सर्वसमावेशक विकासासह देशातील उत्तम राज्य बनवण्यासाठी सरकार करत असलेल्या प्रयत्नांची माहिती प्रधानमंत्र्यांनी दिली. गेल्या काही वर्षांत, केंद्रशासित प्रदेशांनी जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, दळणवळण, आरोग्यसेवा, शिक्षण आणि पर्यटन विकास साधत स्वतंत्र वेगळी ओळख निर्माण केली. तसंच केंद्रशासीत प्रदेशांनी सामाजिक क्षेत्रात भरीव काम केल्याबद्दलही तिथल्या प्रशासनानचं कौतुक केलं.
देश निरोगी असेल तरच विकसीत भारताचं स्वप्न साकार होऊ शकतं असं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं. त्यामुळेच सर्वसामान्यांच्या गरजांबाबत त्यांचे सरकार अतिशय संवेदनशील असून सर्वसामान्य नागरिकांना मुलभूत आरोग्य सोयी-सुविधा पुरवण्यासाठी आणि त्यांना परवडेल अशा किमतीत औषधं उपलब्ध करून देण्यासाठी जनऔषधी केंद्रांचं जाळे देशात विस्तारलं जात असल्याचं सांगत त्यासाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नांची माहिती प्रधानमंत्री मोदी यांनी दिली.
दरम्यान, या सभेआधी प्रधानमंत्र्यांनी दमन, दीव आणि दादरा नगर हवेलीतल्या सिल्व्हासा इथं दोन हजार कोटी ५८७ कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली. सिल्वासा इथं ४५० खाटांच्या नमो रुग्णालयाचं उद्घाटन केलं.
दरम्यान, या सभेआधी प्रधानमंत्र्यांनी दमन, दीव आणि दादरा नगर हवेलीतल्या सिल्व्हासा इथं दोन हजार कोटी ५८७ कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली. सिल्वासा इथं ४५० खाटांच्या नमो रुग्णालयाचं उद्घाटन केलं. याशिवाय सिल्व्हासा इथल्या २ कोटी ५८७ हजार कोटी रुपयांच्या ६२ प्रकल्पांचं उद्घाटन आणि प्रकल्पांची पायाभरणी प्रधानमंत्र्यांनी केली.यामध्ये अनेक गावांतील रस्ते, शाळा, आरोग्य केंद्र, पंचायत आणि प्रशासकीय इमारतींचा समावेश आहे.
आज संध्याकाळी प्रधानमंत्री सुरतला जाणार असून तिथं सुरत अन्न सुरक्षा आणि परिपूर्णता मोहिमेच उद्घाटन करतील. सुरतमधील दोन लाख लाभार्थ्यांना प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेचा लाभ मिळणार आहे. उद्या आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त नवसारीमध्ये होणाऱ्या लखपती दीदी संमेलनाला मोदी उपस्थिती राहणार आहेत. यावेळी २५ हजाराहून अधिक बचत गटांमधील अडीच लाख महिलांना साडेचारशे कोटी रुपयांहून अधिक मदत वितरित करतील.