केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियुष गोयल यांनी आज नवी दिल्लीत २७ आकांक्षित जिल्ह्यांसाठी प्रधानमंत्री गतीशक्ती राष्ट्रीय बृहत् आराखड्याच्या जिल्हा आवृत्तीचा प्रारंभ केला. प्रधानमंत्री गतीशक्ती योजनेला तीन वर्ष पूर्ण झाली असून, पायाभूत सुविधांच्या नियोजनासाठी हे अतिशय उपयुक्त साधन ठरलं आहे, असं ते यावेळी म्हणाले. येत्या १८ महिन्यात जिल्हा बृहत् आराखड्याचा विस्तार ७५० पेक्षा जास्त जिल्ह्यांमधे केला जाईल, असं गोयल यांनी सांगितलं.
Site Admin | October 15, 2024 8:24 PM | Piyush Goyal | PM GatiShakti
२७ आकांक्षित जिल्ह्यांसाठी प्रधानमंत्री गतीशक्ती राष्ट्रीय बृहत् आराखड्याच्या जिल्हा आवृत्तीचा प्रारंभ
