प्रधानमंत्री गतिशक्ती अंतर्गत नेटवर्क प्लॅनिंग गटाच्या ८९ व्या बैठकीत आज रस्ते, रेल्वे आणि मेट्रो क्षेत्रातल्या प्रमुख पायाभूत सेवा प्रकल्पांचे मूल्यांकन करण्यात आले. यावेळी चार रस्ते, तीन रेल्वे आणि एक मेट्रो अशा एकूण आठ प्रकल्पांचे मूल्यांकन करण्यात आले.
यात बदलापूर – कर्जत दरम्यान तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे मार्गिकेच्या कामाचा आढावा घेण्यात आलां. यामुळं मुंबई-पुणे-सोलापूर मार्गावरची प्रवासी आणि मालवाहतुकीची कोंडी दूर व्हायला मदत होईल. तसंच बदलापूर, माथेरान, कर्जतसारख्या भागात राहणाऱ्या नागरिकांना मदत होईल.