प्रधानमंत्री आवास योजनेच्या ग्रामीण भागातल्या दुसऱ्या टप्प्यात आतापर्यंत १६ लाख ८१ हजार ५३१ घरांना मंजुरी देण्यात आली आहे. उर्वरित घरांच्या कामांना गती देण्यासाठी सामाजिक उत्तरदायित्व निधीची मदत घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. सामाजिक क्षेत्रातील फ्लॅगशिप योजनांचा आढावा घेताना ते बोलत होते. यासोबत आयुष्मान भारत आणि राज्य शासनाची महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना यांचा लाभ राज्यातल्या रुग्णांना मिळावा, यासाठी नोंदणीच्या कामाला गती द्यावी. तसंच यामधला मानवी हस्तक्षेप कमी करून डिजिटल यंत्रणा सज्ज करण्याचे निर्देशही फडणवीस यांनी यावेळी दिले.
Site Admin | February 3, 2025 8:40 PM | CM Devendra Fadnavis
सामाजिक क्षेत्रातील फ्लॅगशिप योजनांचा मुख्यंत्र्यांकडून आढावा
