पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी आज सकाळी थायलंडला रवाना झाले. सहाव्या बिमस्टेक शिखर परिषदेत प्रधानमंत्री सहभागी होणार आहेत. 2016 आणि 2019 नंतरचा पंतप्रधानांचा हा तिसरा दौरा आहे. ते आज संध्याकाळी थायलंडचे प्रधानमंत्री पेटोंगटार्न शिनावात्रा यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील.
या प्रसंगी अनेक द्विपक्षीय करारांवर सह्याही केल्या जाणार आहेत. बिमस्टेक परिषद उद्या होणार असून, बिमस्टेक – संपन्न, लवचिक आणि खुली असं या परिषदेचं ब्रीदवाक्य आहे. या परिषदेनंतर प्रधानमंत्री मोदी उद्या श्रीलंकेला तीन दिवसांच्या दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत. त्यांचा हा चौथा श्रीलंका दौरा आहे.