भारतीय सशस्त्र सेना दलांनी देश संरक्षणासाठी दाखवलेला पराक्रम कायम प्रेरणादायी आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सशस्त्र सेना ध्वज दिनानिमित दिलेल्या संदेशात म्हटलं आहे. आजचा दिवस सशस्त्र सेना दलाच्या पराक्रमाचा आणि हौतात्म्याचा सन्मान करण्यासाठी पाळला जात असल्याचं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही भारतीय सैन्य दलाच्या धैर्य, पराक्रम, समर्पण आणि त्यागाला वंदन केलं. यानिमित्तानं देशवासीयांनी सशस्त्र सेना ध्वज निधीत योगदान द्यावं असं आवाहन प्रधानमंत्री आणि सरंक्षणमंत्र्यांनी केलं.
सशस्त्र सेना ध्वज दिनानिमित्त राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी आज राजभवनात सशस्त्र सेना ध्वज निधी संकलन मोहिमेचा प्रारंभ केला. सीमेवर जवान सजग पहारा देत असल्यामुळे देशात नागरिक सुखानं राहू शकतात आणि देश प्रगती करू शकतो. ही जाणीव ठेवून प्रत्येकानं सशस्त्र सैन्यदल ध्वजनिधीत योगदान दिलं पाहिजे, असं राज्यपाल म्हणाले.