मॉरिशसच्या ५७ व्या राष्ट्रीय दिन समारंभासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. मॉरिशसचे प्रधानमंत्री नवीन रामगुलम यांनी संसदेत ही घोषणा केली. प्रधानमंत्री मोदी यांचे आतिथ्य करणे हा मॉरिशससाठी सन्मान असल्याचं रामगुलम यांनी म्हटलं आहे.
१२ मार्च १९६८ रोजी ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाल्यानिमित्त मॉरिशस दरवर्षी राष्ट्रीय दिन साजरा करतो. गेल्या वर्षी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मॉरिशसच्या राष्ट्रीय दिन समारंभात प्रमुख पाहुण्या म्हणून हजेरी लावली होती.