नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणजे देशाचं बौद्धिक पुनर्जागरण आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी एका दैनिकात लिहिलेला लेख प्रधानमंत्र्यांनी सामायिक करताना हे वक्तव्य केलं.
नवं शैक्षणिक धोरण शिक्षण आणि नवोन्मेषाच्या माध्यमातून आत्मनिर्भर आणि जागतिक स्तरावर प्रतिस्पर्धा करु शकणारं राष्ट्र घडवण्याचा मार्ग प्रशस्त बनवत आहे, असंही प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे.