डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

प्रधानमंत्री येत्या ३ एप्रिलपासून थायलंडच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर जाणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या ३ एप्रिलपासून थायलंडच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. थायलंडची राजधानी बँकॉक इथे सहाव्या बिमस्टेक शिखर परिषदेत ते सहभागी होती. थायलंडचे प्रधानमंत्री पेतोंगटार्न शिनावात्रा यांनी मोदी यांना या दौऱ्यासाठी निमंत्रित केलं आहे. प्रधानमंत्र्यांचा तिसरा थायलंड दौरा असेल.

 

या दौऱ्यात ते बिमस्टेक नेत्यांशी सहकार्य वाढवण्यासाठी चर्चा करणार आहेत. या भेटीनंतर मोदी हे श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुराकुमारा दिसानायके यांच्या निमंत्रणावरून श्रीलंकेच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात ते दोन्ही देशांमध्ये आधी झालेल्या सहकार्याच्या क्षेत्रांमध्ये झालेल्या प्रगतीचा आढावा घेतील.

 

याखेरीज ते अनेक राजकीय नेत्यांसोबत बैठकांनाही उपस्थित राहतील आणि भारताच्या सहकार्याने राबवलेल्या विकास प्रकल्पांच्या उद्घाटनासाठी अनुराधापुरा इथे उपस्थित राहतील.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा