आगामी IPL चे लिलाव २४ आणि २५ नोव्हेंबरला सौदी अरेबियातल्या जेद्दाहमध्ये होणार आहेत. BCCI ने काल ही घोषणा केली. ११६५ भारतीय आणि ४०९ परदेशी असे एकूण १ हजार ५७४ खेळाडू या लिलावात सहभागी होणार आहेत. प्रत्येक फ्रँचाइसीला एकूण २५ खेळाडू निवडता येतील. सुमारे साडे सहाशे कोटी रुपयांची उलाढाल यंदा होण्याची शक्यता आहे.