डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

November 7, 2024 10:04 AM

printer

छटपूजा निमित्त उद्यापासून 11 तारखेपर्यंत 160 विशेष रेल्वे फेऱ्यांचं नियोजन

भारतीय रेल्वेनं गेल्या 46 दिवसांमध्ये 4521 विशेष रेल्वे फेऱ्यांच्या माध्यमातून 65 लाख प्रवाशांची ने-आण केली आहे. छटपूजा सणाच्या निमित्तानं येत्या 8तारखेपासून 11 तारखेपर्यंत आणखी 160 विशेष रेल्वेही फेऱ्यांचंही नियोजन करण्यात आलं आहे. गेल्या सोमवारी म्हणजे चार नोव्हेंबरला एकाच दिवसात 120 लाख प्रवाशांची ने-आण करून रेल्वेनं एका दिवसात सर्वाधिक प्रवाशांची ने-आण करण्याचा विक्रम केला आहे. या दिवशी वीस लाख आरक्षित आणि एक कोटी अनारक्षित प्रवाशांची ने-आण करण्यात आली, असे रेल्वेनं प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.

 

रेल्वेनं 1 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर या काळात एकंदर 7600 विशेष रेल्वे फेऱ्यांचं नियोजन केलं आहे. या फेऱ्या गेल्या वर्षीपेक्षा 73 टक्क्यांनी जास्त आहेत. उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि ओडिशाकडे पश्चिम रेल्वेतर्फे 375 विशेष रेल्वे फेऱ्या सोडण्यात येत आहेत. या फेऱ्या व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी आणि वेळापत्रकावर देखरेख ठेवण्यासाठी विशेष नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आल्याचं पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी सांगितलं आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा