केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी देशभरात चालक प्रशिक्षण संस्था स्थापन करण्याविषयीची योजना जाहीर केली असून अशा संस्था उभारण्यासाठी सरकार प्रोत्साहन देणार आहे.
ते काल बातमीदारांशी बोलत होते. देशात कुशल चालकांची वानवा असून चालक प्रशिक्षण संस्था उभारण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं त्यांनी सांगितलं. सगळी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाच्या वाहतूक मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत रस्ता सुरक्षेला अत्युच्च प्राधान्य देण्यात आलं असंही ते म्हणाले.
रस्ते आणि वाहतूक क्षेत्रात बदल घडवून आणण्याच्या उद्देशानं सर्व प्रकारच्या अडचणी, त्यावरचे उपाय यावर चर्चा झाल्याचं सांगितलं.स्वयंचलित तपासणी केंद्रांच्या उभारणीसाठी देखील सरकार जादा प्रोत्साहन देणार आहे.