प्राध्यापक के. व्ही. सुब्रमण्यम लिखित इंडिया @ 100 एनव्हिजनिंग टुमारोज एकॉनॉमिक पॉवर हाऊस या पुस्तकांचं प्रकाशन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते काल नवी दिल्ली इथं करण्यात आलं. या प्रसंगी बोलताना गोयल म्हणाले, 140 कोटी नागरिकांच्या एकत्रित प्रयत्नानी विकसित भारताचं ध्येय साध्य होऊ शकतं. भारत 2047 पर्यन्त पायाभूत सुविधा, रोजगार निर्मिती, पर्यटन, निर्मिती, मालवाहतूक आणि तंत्रज्ञान यासह सर्वच क्षेत्रात विकसित राष्ट्र म्हणून गणला जाईल असा विश्वासही गोयल यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
Site Admin | August 1, 2024 10:03 AM | इंडिया @ 100 | पीयूष गोयल | प्राध्यापक के. व्ही. सुब्रमण्यम