फिलीपिन्समधल्या नेग्रोस बेटावरच्या माउंट कानलाओन या ज्वालामुखीचा उद्रेक झाल्या असून या भागातून सुमारे ८७ हजार लोकांचं स्थलांतर करण्यात आलं आहे. या उद्रेकात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी, संभाव्य उद्रेकांचा धोका असल्यानं सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. ज्वालामुखीची राख विस्तृत क्षेत्रावर पडल्यानं तिथली दृश्यमानता कमी झाली असून आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. देशांतर्गत आणि देशाबाहेरील उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत किंवा मार्ग बदलण्यात आले आहेत, अशी माहिती फिलिपिन्सच्या नागरी संरक्षण कार्यालयानं दिली आहे.