फिलिपिन्सचे माजी अध्यक्ष रॉड्रिगो दुटर्टे यांना आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाच्या वॉरंट अंतर्गत आज मनिला विमानतळावर अटक करण्यात आली. दक्षिण फिलिपिन्समधल्या दावाओ शहराचे महापौर आणि नंतर राष्ट्राध्यक्ष असताना त्यांच्या आदेशावरून झालेल्या नरसंहाराच्या गुन्ह्यासाठी त्यांच्यावर हे वॉरंट बजावण्यात आलं आहे. जागतिक न्यायालयाने अशा प्रकारे अटक केलेले ते पहिले माजी आशियाई नेते आहेत. फिलिपिन्स पोलिसांच्या अंदाजानुसार सहा हजाराहून जास्त आणि मानवाधिकार गटांच्या अंदाजानुसार ३० हजाराहून जास्त नागरिकांच्या हत्या घडवून आणण्याचा आरोप दुटर्टे यांच्यावर आहे.
Site Admin | March 11, 2025 6:44 PM | Philippines | Rodrigo Duterte
फिलिपिन्सचे माजी अध्यक्ष रॉड्रिगो दुटर्टे यांना मनिला विमानतळावर अटक
