केंद्र सरकारनं घरगुती वापराच्या एलपीजी सिलिंडरची किंमत ५० रुपयांनी वाढवली आहे. उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना उद्यापासून हे सिलिंडर ५५० रुपयांना तर इतरांना ८५३ रुपयांना मिळतील, अशी माहिती पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी नवी दिल्लीत वार्ताहरांना दिली.
पेट्रोल आणि डिझेलवरचं उत्पादन शुल्क लिटरमागे २ रुपयांनी वाढवण्याचा निर्णयही केंद्र सरकारनं घेतला आहे. पण त्याची झळ सर्वसामान्य नागरिकांना जाणवणार नाही. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमती कमी झाल्या आहेत. त्यामुळं पेट्रोलियम कंपन्यांना स्वस्तात कच्चे तेल मिळते आहे. परिणामी या शुल्कवाढीचा फटका ग्राहकांना जाणवणार नाही, असं पेट्रोलियम मंत्र्यांनी सांगितलं.