छत्रपती संभाजीनगर इथं मराठवाडा जलसमृद्धी प्रतिष्ठान, टीम ऑफ असोसिएशन, मसिया संघटना, साखर कारखाने आणि शेतकरी सहकारी पाणीवाटप संस्था यांच्या वतीने मराठवाड्यातला पाणी प्रश्न आणि सिंचन विकास या विषयावर जलसंवाद -२०२५ ही परिषद काल घेण्यात आली. समन्यायी पद्धतीने पाणी मिळावं यासाठी मराठवाड्यातल्या जनप्रतिनिधींनी एकत्र येऊन लढा द्यावा, अशी मागणी, जलतज्ज्ञांनी यावेळी केली. या एक दिवसीय परिषदेला पालकमंत्री संजय शिरसाठ यांच्यासह इतर लोकप्रतिनिधी उपस्थित होते. सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांनी यावेळी बोलताना, मराठवाड्याला हक्काचं पाणी मिळण्यासाठी निर्माण झालेली ही समस्या भांडण -तंटा न करता देखील सोडवता येऊ शकते, असं मत व्यक्त केलं. कोकणातून सह्याद्री पर्वतरांगेपर्यंत बंद पाईपने पाणी आणणं सहज शक्य आहे, यातून जलविद्युत प्रकल्प देखील उभारता येईल. सर्व अर्थाने उपयुक्त असा हा पर्याय असल्याचं ते म्हणाले.
Site Admin | February 3, 2025 11:12 AM | Jal Parishad | Marathwada
मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी जनप्रतिनिधींनी एकत्र यावं, जलपरिषदेत एकमत
