डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

१८वी लोकसभा अनेक बाबतीत ऐतिहासिक असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन

देशातल्या जनतेनं या सरकारला तिसऱ्यांदा निवडून देऊन, गेल्या दहा वर्षातल्या सेवा आणि सुशासनावर पसंतीची मोहोर उमटवली आहे, असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल केलं. अठराव्या लोकसभेच्या स्थापनेनंतर संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला त्यांनी संबोधित केलं. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील रालोआ सरकार आपल्या आकांक्षा पूर्ण करेल, असा जनतेला विश्वास वाटतो, असं संगत; अठरावी लोकसभा अनेक बाबतीत ऐतिहासिक असल्याचं त्या म्हणाल्या.

 

पेपर फुटीप्रकरणी सरकार ठोस उपाययोजना करत आहे, या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी केली जाईल, संसदेनं पेपरफुटीसंदर्भात कायदा बनवला आहे, असं राष्ट्रपती म्हणाल्या. गेल्या दहा वर्षात भारताच्या अर्थव्यवस्थेनं अकराव्या स्थानावरून पाचव्या स्थानावर झेप घेतली आहे. आपण आता हरित युगाकडे वाटचाल करत आहोत, यासाठी सरकार आवश्यक ती पावलं उचलत आहे. हरित उद्योगांमध्ये गुंतवणूक वाढवत असल्यामुळे रोजगार निर्मितीतही वाढ होईल असा विश्वास राष्ट्रपतींनी व्यक्त केला.येत्या १ जुलैपासून देशात नवे फौजदारी कायदे लागू होणार आहे, याद्वारे आता दंडाऐवजी न्यायाला प्राधान्य दिलं जाणार आहे,असं त्या म्हणाल्या.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा