बांगलादेशाच्या इमिग्रेशन आणि पारपत्र विभागाने बेपत्ता झालेल्या आणि गेल्या वर्षी जुलै महिन्यात झालेल्या हत्याकांडात कथित सहभागामुळे माजी प्रधानमंत्री शेख हसीना यांच्यासह ९७ जणांची पारपत्रं रद्द केली आहेत. बांगलादेश सरकारच्या मुख्य सल्लागारांचे उपसचिव अब्दुल कलाम आझाद यांनी ही माहिती वार्ताहर परिषदेत दिली आहे.
यापैकी २२ जणांची पारपत्र बांगलादेशाहून स्वतःहून बेपत्ता झाल्यामुळे तर ७५ जणांची पारपत्र जुलैमध्ये झालेल्या हत्याकांडात सहभागी झाल्यामुळे रद्द झाल्याची माहिती त्यांनी दिली. शेख हसीना यांच्यावरही या हत्याकांडात सहभागी असल्याचा आरोप आहे. मात्र, शेख हसीना यांच्याखेरीज अन्य कुठल्याही व्यक्तिचं नाव आझाद यांनी उघड केलेलं नाही, अशी माहिती बांगलादेशाच्या स्थानिक वृत्तसंस्थेने दिली आहे.