नाशिक जिल्हा महिला सहकारी बॅंकेच्या माजी अध्यक्ष, आणि सहकार भारतीच्या माजी प्रदेशाध्यक्ष डॉ. शशी आहिरे याचं आज सकाळी नाशिकमध्ये निधन झाले. त्या ७६ वर्षांच्या होत्या. डॉ. शशी आहिरे यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी नाशिक जिल्हा महिला सहकारी बँकेच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य केलं. या बँकेच्या त्या २० वर्ष अध्यक्ष होत्या. महाराष्ट्र नागरी बँक्स असोसिएशन, नाशिक जिल्हा पतसंस्था फेडरेशनच्या पदाधिकारी म्हणून त्यांनी काम केलं, डॉ. शशी आहिरे यांच्या निधनाबद्दल विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी दु:ख व्यक्त केलं आहे.
Site Admin | January 7, 2025 7:11 PM | Shashi Ahire
सहकार भारतीच्या माजी प्रदेशाध्यक्ष डॉ. शशी आहिरे याचं निधन
