रत्नागिरी पंचायत समितीचे माजी सभापती आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सुहास वामन, उर्फ कुमार शेट्ये यांचं आज दुपारी रत्नागिरी इथं निधन झालं. ते ७० वर्षांचे होते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून त्यांनी विविध क्षेत्रांमध्ये आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला. शिरगाव ग्रामपंचायतीचे ते दीर्घ काळ सरपंच होते. या काळात केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजना गावात राबविण्यात त्यांचा पुढाकार होता. त्यांच्या निधनामुळे एक संवेदनशील राजकीय नेता हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
Site Admin | December 27, 2024 7:11 PM | Suhas Waman
रत्नागिरी पंचायत समितीचे माजी सभापती सुहास वामन यांचं निधन
