राष्ट्रीय औष्णिक वीज प्रकल्पात इंधन म्हणून कोळशासोबत बांबू बायोमासचा वापर करण्याचा निर्णय झाला असून शेतकरी उत्पादक कंपन्यांबरोबर त्यासाठी ५० वर्षांचा खरेदी करार करण्यात येईल असं NTPC चे अध्यक्ष गुरदीप सिंह यांनी सांगितलं. NTPC च्या सोलापूर प्रकल्पात दरवर्षी ४० लाख टन कोळसा लागतो. त्यात १०% बांबू बायोमास मिसळलं तर चार लाख टन बायोमासची गरज असणार आहे तेव्हा शेतकऱ्यांनी बांबूलागवडीला प्राधान्य द्यावं असं आवाहन त्यांनी केलं. सोलापूर इथं झालेल्या बैठकीत ते बोलत होते. मुख्यमंत्री पर्यावरण संतुलित विकास टास्कफोर्सचे कार्यकारी अध्यक्ष पाशा पटेल यांनी सुचवल्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या निर्देशांनुसार ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
एशियन डेवलमेट बँकेमार्फत (ADB) दहा हेक्टर पर्यंत बांबू लागवडीसाठी अनुदानाची योजना आकाराला येत असल्याचं पटेल यांनी यावेळी सांगितलं.