७८वा स्वातंत्र्य दिनानिमित्त दिल्लीतल्या लाल किल्ल्यावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ध्वजारोहण करतील. त्यानंतर ऐतिहासिक तटबंदीवरून ते देशाला संबोधित करतील. यंदाच्या स्वातंत्र्य दिन सोहळ्याची संकल्पना विकसित भारत अशी आहे. स्वातंत्र्य दिन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी केंद्र सरकारनं देशभरातल्या विशेष पाहुण्यांना आमंत्रित केलं आहे. यामध्ये महाराष्ट्रातल्या १२३ हून अधिक व्यक्तिंचा समावेश आहे. यात विशेष आमंत्रितांसह महिला, युवक, शेतकरी, आदिवासी, क्षेत्रीय अधिकारी आणि विविध सरकारी योजनांचे लाभार्थी, MyGov स्वातंत्र्य दिन प्रश्नमंजुषेचे विजेते आणि नीति आयोगाच्या विशेष आमंत्रितांसह समाजातल्या विविध घटकांचा समावेश असेल.
Site Admin | August 14, 2024 3:31 PM | Partition Horrors Remembrance Day