डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

पारशी नववर्ष नवरोजनिमित्त राष्ट्रपती आणि प्रधानमंत्र्यांकडून शुभेच्छा

देशभरात आज नवरोज उत्साहात साजरा केला जात आहे. पारशी बांधवानी अग्यारीत जाऊन या निमित्त प्रार्थना केली आणि सर्वांना शुभेच्छा दिल्या. 

 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज पारशी नववर्ष, नवरोजनिमित्त सर्व नागरिकांना, विशेषत: पारशी समाजातल्या लोकांना शुभेच्छा दिल्या आहेत. नवरोज हे आनंद, उत्साह आणि विश्वासाचं प्रतीक असल्याचं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. पारशी समाजानं आपल्या परिश्रमातून देशाच्या विकासात मोठं योगदान दिले आहे असं राष्ट्रपतींनी सांगितलं,

 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही याप्रसंगी देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. हा नवरोज भरपूर आनंद, यश आणि उत्तम आरोग्य घेऊन येवो अशी इच्छा मोदींनी समाजमाध्यमावरील एका पोस्टमध्ये व्यक्त केली. देशातले बंधुभावाचे बंध अधिक दृढ व्हावेत, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा