डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

December 13, 2024 2:48 PM | ParliamentAttack2001

printer

संसद हल्ल्यातल्या शहिदांना आज संसदेच्या दोन्ही सभागृहात आदरांजली

संसद हल्ल्यातल्या शहिदांना आज संसदेच्या दोन्ही सभागृहात आदरांजली वाहण्यात आली. दोन्ही सदनात मौन पाळून शहिदांना अभिवादन करण्यात आलं. शहिदांचं साहस आणि समर्पण वृत्तीला देश कधीच विसरू शकणार नाही असं लोकसभेचं सभापती ओम बिर्ला यांनी सांगितलं. दहशतवादाचा मुकाबला करण्याच्या देशाच्या अढळ संकल्पाचा त्यांनी पुनरुच्चार केला. तर दहशतवाद्यांचा मनसुबा उधळून लावत आपल्या शूर सुरक्षारक्षकांनी अतुलनीय साहस दाखवलं असं राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांनी सांगितलं. आपलं ऐक्य, न्याय आणि स्वातंत्र्य यांच्या रक्षणासाठी नागरिकांनी कायम एकजुटीनं राहावं असं ते म्हणाले. 

 

देशाचं संविधान भारतीय नागरिकांनी तयार केलं असून ते भारताच्या मूल्यांवर आधारित आहे, असं संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी आज लोकसभेत सांगितलं. देशानं राज्यघटना स्वीकारली त्या घटनेला ७५ वर्षं पूर्ण होत असल्यानिमित्त लोकसभेत आजपासून विशेष चर्चा सुरु झाली.   या चर्चेला सुरुवात करताना संरक्षण मंत्री बोलत होते.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा