पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत आज बॅडमिंटनमध्ये महिलांच्या एसयू – पाच प्रकारात भारताच्या मनीषा रामदास हीनं उपांत्य फेरीत धडक मारली आहे. उपान्त्य फेरीत तिचा सामना भारताच्याच टी मुरुगेशन सोबत होणार आहे. त्यामुळे या स्पर्धेतलं भारताचं एक पदक निश्चित झालं आहे. पुरुष एकेरीतही एस एल पाच – प्रकारात उपान्त्य फेरीचा सामना भारताच्या सुकांत कदम आणि सुहास यतिराज यांच्यात होणार आहे. या स्पर्धेत भारत एक सुवर्ण, एक रौप्य आणि तीन कांस्य पदकांसह २२व्या स्थानावर आहे.
Site Admin | September 1, 2024 8:07 PM | Paris Paralympics 2024
पॅरिस पॅरालिम्पिक : बॅडमिंटनमध्ये महिलांच्या एसयू – पाच प्रकारात भारताच्या मनीषा रामदासची उपांत्य फेरीत धडक
