पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या १०० मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत ज्योती याराजी हिनं सातवं स्थान मिळवून पुढच्या फेरीत प्रवेश केला. कुस्तीत महिलांच्या ५३ किलो वजनी अंतिम पंघलला तुर्किएच्या प्रतिस्पर्ध्याकडून १०-० असा पराभव पत्करावा लागला. महिलांच्या टेबल टेनिस सांघिक उपांत्यपूर्व फेरीत जर्मनीनं भारताचा ३-१ असा पाडाव केला. भालाफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवण्यात अन्नू राणी हिला अपयश आलं. मॅरेथॉन रेस वॉक मिश्र रिले स्पर्धेत सूरज पन्वर आणि प्रियांका गोस्वामी या दोघांनाही स्पर्धा पूर्ण करता आली नाही.
Site Admin | August 7, 2024 7:32 PM | Paris Olympics 2024
पॅरिस ऑलिम्पिक : १०० मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत ज्योती याराजी पुढच्या फेरीत दाखल
