डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भालाफेक स्पर्धेत नीरज चोप्राचा अंतिम फेरीत प्रवेश

 

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भालाफेक स्पर्धेत नीरज चोप्रानं अंतिम फेरीत स्थान मिळवलं आहे. पात्रता फेरीत ब गटातून पहिल्याच प्रयत्नात त्यानं ८९ पूर्णांक ३४ शतांश मीटर इतका लांब भाला फेकला. या हंगामातली नीरजची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. 

महिलांच्या ५० किलो वजनी गटातल्या कुस्ती स्पर्धेत विनेश फोगाटनं उपांत्य फेरीत प्रवेश केल्यानं ऑलिम्पिक पदक मिळवण्याचं तिचं स्वप्न कायम आहे. विनेशनं उपांत्यपूर्व फेरीत युक्रेनच्या ओकसाना लिवाच हिला पराभूत करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. तत्पूर्वी उपउपांत्यपूर्व फेरीत विनेशनं जपानच्या युई सुसाकी हिला ३-२ असं पराभूत केलं. आज रात्री साडेदहा वाजता उपांत्य फेरीत विनेशची लढत क्युबाच्या युसनेलिस गुझमान लोपेझ हिच्याशी होणार आहे. 

हॉकीमध्ये आज भारताचा उपांत्य फेरीत जर्मनीशी लढत होणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार हा सामना रात्री १० वाजून ३० मिनिटांनी सुरू होईल.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा