डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

पॅरिस ऑलिम्पिक, पॅरा ऑलिम्पिक आणि बुद्धीबळ ऑलिम्पियाड स्पर्धेतले विजेते खेळाडू आणि प्रशिक्षकांचा सन्मान

पॅरिस ऑलिम्पिक आणि पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा तसंच बुडापेस्ट इथं झालेल्या बुद्धीबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत गौरवास्पद कामगिरी करणाऱ्या राज्यातील खेळाडूंचा आणि त्यांच्या प्रशिक्षकांचा आज सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या कार्यक्रमात सन्मान करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते त्यांना धनादेश आणि स्मृतीचिन्ह देण्यात आलं.

 

ऑलिंम्पिक स्पर्धेत नेमबाजी प्रकारात कांस्य पदक विजेता स्वप्नील कुसळे आणि त्याच्या प्रशिक्षक दीपाली देशपांडे यांना अनुक्रमे दोन कोटी रुपये आणि २० लाखांचा धनादेश आणि सन्मानचिन्ह देण्यात आलं. तर पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत गोळाफेक प्रकारात रौप्य पदक जिंकणाऱ्या सचिन खिलारी याला तीन कोटी रुपये तर त्याचे प्रशिक्षक अरविंद चव्हाण यांना ३० लाख रुपयांचा धनादेश आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. बुडापेस्ट, हंगेरी इथं झालेल्या ४५ व्या बुद्धीबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतानं सुवर्ण पदक जिंकलं. या संघात असलेल्या राज्यातील बुद्धीबळपटू विदीत गुजराथी आणि दिव्या देशमुख यांना राज्य सरकारनं प्रत्येकी रोख एक कोटी रुपये आणि त्यांचे मार्गदर्शक अनुक्रमे संकल्प गुप्ता आणि अभिजीत कुंटे यांना प्रत्येकी १० लाख रुपये आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा