पॅरीस ऑलिम्पिकमध्ये, भारतीय हॉकी संघानं काल पेनल्टी शूट आउटमध्ये ब्रिटनला 4-2 अशी मात देत उपांत्य फेरीत धडक मारली. अमित रोहितदासला रेड कार्ड दाखवल्यानंतर दहा खेळाडूंच्या भारतीय संघानं संपूर्ण सामन्यावर आपलं वर्चस्व राखलं होतं. दोन्ही संघांची 1-1 अशी बरोबरी झाल्यानंतर पेनल्टी शूट आऊट मध्ये चार गोल करुन विजय खेचून आणत भारताच्या संघानं उपांत्य फेरीत प्रवेश केला. दरम्यान, बँडमिंटन स्पर्धेत लक्ष्य सेनला उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला.
Site Admin | August 5, 2024 10:01 AM | #ParisOlympics #IndiaAtParis #Paris2024 | #ParisOlympics2024.
पॅरीस ऑलिंपिकमध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाची उपांत्य फेरीत धडक
