परभणीतल्या हिंसाचार प्रकरणाची राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगानं गंभीर दखल घेतली आहे. या घटनेची सखोल चौकशी करुन वस्तुनिष्ठ तपशीलवार अहवाल आयोगाकडे तत्काळ सादर करण्याचे निर्देश आयोगानं परभणीचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांना दिले आहेत.
या प्रकरणी पोलिसांनी एकूण ८ गुन्ह्यांची नोंद केली असून, आतापर्यंत ५० जणांना अटक केली आहे. अटक केलेल्या व्यक्तीचा पोलीस कोठडी किंवा जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यू झाल्याचं वृत्त खोटं आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि बाजारपेठा सुरळीत सुरू ठेवाव्या असं आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले आहे.
याप्रकरणी निर्दोष व्यक्तींवर पोलीस प्रशासन करत असलेली कारवाई त्वरित थांबवावी आणि याप्रकरणी आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे त्वरित रद्द करावेत, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीनं केली आहे. याप्रकरणी जालना, गडचिरोली जिल्ह्यात कोरची इथं निदर्शनं झाली.